ना जात-धर्म ना पैसा, परभणीकरांची फक्त विकासाला साथ; तब्बल 80,803 च्या मराठवाड्यातील विक्रमी मताधीक्याने विजय, सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉजिट जप्त!
परभणी मतदारसंघातील मायबाप जनतेने 2014 साली संधी दिली. या संधीचं सोनं करून मागील 5 वर्षात मतदारसंघाच्या संपुर्ण विकासाचं स्वप्न उराशी बाळगून अथक अविरत मेहनत घेतली. आणि मेहनतील मोठ्या प्रमाणावर यश मिळालं, अनेक कामे मार्गी लागली. केलेल्या कामांची दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब व युवासेना प्रमुख आदीत्य साहेबांनी विश्वास दाखवत पुन्हा एकदा पक्षाची उमेदवारी दिली.
महायुतीचा उमेदवार म्हणुन दुसऱ्यांदा परभणी विधानसभेच्या निवडणुकीत उतरलो. सुरूवातीपासून फक्त आणि फक्त केलेली कामे व परभणीच्या विकासाचा मुद्दा जनतेसमोर मांडला. विरोधकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जात-धर्म व पैसा पुढे केला मात्र मी व संपुर्ण महायुती सहकारी विकासाच्या मुद्यावर ठाम राहीलो.
आणि आज निकाल पाहता परभणीकरांनी विकासाला विक्रमी मतदान केल्याचे दिसून आले. तब्बल 1,03,469 इतके मतदान देऊन मराठवाड्यातील विक्रमी मताधीक्याने विजयी केल्याबद्दल परभणीच्या मायबाप जनतेचे अंत:करणापासून ऋण व्यक्त करतो.
तसेच जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माझ्या जिवाभाच्या सर्व सहकाऱ्यांचा देखील आभारी आहे.