पक्षादेश मानून दिलीप सोपलांच्या विजयासाठी जिवाचे राण करणार : राजेंद्र मिरगणे

पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य : आंधळकर

बार्शी : भारतीय जनता पार्टी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश प्रमाण मानून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या साठी प्रामाणिक पणे काम करू.विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा मोठा झंझावात बार्शीत पहायला मिळेल. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात मजबूत बूथ यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून सर्वजण मिळून महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांना चाळीस हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी करू अशी ग्वाही महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना शहरप्रमुख दिपक आंधळकर, भाजपा तालुकाध्यक्ष बिभीषन पाटील, शहराध्यक्षा अश्विन गाढवे, विस्तारक बाबा शेख, भाजयुमो तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष महेदिमिया लांडगे, महिला
आघाडी जिल्हाध्यक्षा पद्मजा काळे, शहराध्यक्षा प्रतिभा मुळीक, रामराजे पवार, रासप नेते रविंद्र चकोर रिपाई नेते अॅड.अविनाश गायकवाड, राजाभाऊ काकडे, बाळासाहेब पवार, अविनाश शिंदे, दिनेशसिंह परदेशी, शिरीष घळके, शिवाजीराव पवार, मांडेगावचे सरपंच पंडीत मिरगणे, अमर आवटे, बंडु मिरगणे, नगरपालिका विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, पंचायत समिती माजी सभापती युवराज काटे, बंडु माने आदी, आशु सय्यद उपस्थित होते.

यावेळी स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर माझी निष्ठा आहे. तसेच
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रचार कार्यात पुर्ण वेळ झोकुन देवुन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी बार्शी तालुक्यातून
महायुतीच्या उमेदवारासाठी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यात पुर्ण वेळ तण, मन, धनाने सहभागी व्हावे. तसेच गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून झालेले लोककल्याणकारी काम जनतेपर्यंत पोहचवावे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या उमेदवारामागे सर्व ताकद उभी करण्याचे आवाहन केले आहे.

युतीधर्म पाळावा हाच मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे. महायुतीच्या मागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. महायुतीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या उमेदवारावर कोणती कारवाई करायची याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष घेतील असे त्यांनी सांगितले. तसेच महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या रूपाने एक अनुभवी नेतृत्व लाभले असल्याचे सांगितले व महायुतीच्या सर्व घटक पक्षामध्ये सुसंवाद
आहे त्यामुळे एकजुटीने, एकदिलाने व खंबीरपणे प्रचार कार्यात आघाडी घेवु असे सांगितले.

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी महायुतीचे सर्व घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्याला उमेदवारी दिल्यानंतर मनापासून पाठींबा व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार मानत प्रत्येक निवडणूकही मी गंभीरपणेच घेतो. सर्वांना बरोबर घेवुन यश मिळवू असा आत्मविश्वास व्यक्त केला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: