पंतप्रधान मोदींकडे आहे एवढ्या खात्यांचा कार्यभार, इतरांना न देता स्वत:च पाहणार काम

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या कामांचे वाटप केले आहे. पंतप्रधानांशिवाय एकूण 57 जणांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. यात अमित शाह गृहमंत्री, राजनाथ सिंह संरक्षणमंत्री आहेत. अनेक मंत्रालये अशीही आहेत जी कोणालाही देण्यात आलेली नाहीत. पंतप्रधान मोदींनी ही सर्व खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. यात कार्मिक आणि अंतराळ मंत्रालयाचाही समावेश आहे.

पंतप्रधानांकडे असलेली खाती

1. पंतप्रधान कार्यालय
2. कार्मिक मंत्रालय
3. जनतक्रार आणि पेन्शन मंत्रालय
4. आण्विक ऊर्जा मंत्रालय
5. अंतराळ मंत्रालय
6. योजनांशी संबंधित सर्व मुद्दे
7. अशा सर्व जबाबदाऱ्या ज्या इतरांना देण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व पंतप्रधानांकडे आहेत.

मागच्या कार्यकाळातही पंतप्रधानांकडे ही सर्व खाती होती. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ही सर्व खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. अंतराळ मंत्रालयाअंतर्गतच ISRO येते. इस्रो सध्या चंद्रावर माणूस पाठवण्याव्या मोहिमेवर काम करत आहे.
कार्मिक मंत्रालयाची जबाबदारी म्हणजे सर्व केंद्रीय अधिकाऱ्यांच्या बदलीशी संबंधित मुद्दे असतात. मागच्या कार्यकाळात दिल्ली सरकार आणि केंद्रामध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीवरून अनेक प्रकरणे उदभवली होती.

कुणाला कोणते मंत्रालय?

पंतप्रधानांनी पुन्हा एकदा आपल्या कोअर टीमवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. अमित शाह यांना देशाचे गृहमंत्री बनवले आहे. राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. तर निर्मला सीतारामन यांना अर्थ खाते दिले आहे.

गुरुवार संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील 57 सहकाऱ्यांसमवेत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता मोदी सरकारच्या कॅबिनेटची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

admin: