पंढरीतील महाराज मंडळींचा मोठा निर्णय;400 वर्षात प्रथमच होणार परंपरा खंडित

पंढरपूर – कानड्या विठुरायाच्या वर्षभरात आषाढी, कार्तिकी, चैञी व माघी या प्रमुख चार याञा भरतात. या याञेसाठी देशभरातुन लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. माञ सध्या कोरोना या महाभयंकर आजाराचे संकटामुळे पंढरीतील महाराज मंडळींनी ही याञा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ४०० वर्षाची परंपरा असलेली चैञी याञा यावर्षी प्रथमच खंडीत होणार आहे. 

येत्या 4 एप्रिल रोजी चैञी याञेचा सोहळा होणार होता. मात्र कोरोना च्या जीवघेण्या सावटामुळे चैत्रीचा हा सोहळा रद्द करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप देवव्रत महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराज मंडळीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी हभप चैतन्य महाराज देहुकर, हभप निवृत्ती महाराज नमदास, हभप रामकृष्ण महाराज वीर, हभप भाऊसाहेब महाराज गोसावी आदी उपस्थित होते.
पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी…वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी देशावरील आलेले कोरोणाचे संकट भयंकर आहे. 


जनतेच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. 
वारीची परंपरा खंडीत होते आहे हे कारण काढून कोणीही पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करु नये. असेही आवाहन महाराज मंडळींनी केले आहे. वारीची परंपरा स्थानिक महाराज मंडळी रुढी नुसार पार पाडतील. जे नियमाचे वारकरी आहेत त्यांना आपल्या घरातच व्रतवैकल्य करुन श्री विठ्ठल रखुमाई चे पूजन करावे पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करुन नये 
कोरोनामुळे सध्या श्री विठ्ठल मंदिर बंद आहे तेंव्हा वारकऱ्यांनी
आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तमाम वारकरी मंडळींना केले आहे.

वारकरी – फडकरी – दिंडीकरी संघटनेने चैत्री वारीला वारकऱ्यांनी येवू नये असे आवाहन केलेले आहे वारकऱ्यांनी वारकरी संप्रदायाच्या शिस्तीचे पालन करण्याचे आवाहान हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर
(सदस्य, श्री विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर) यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: