पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी चे आजपासून 24 तास दर्शन सुरू

पंढरपूरची सर्वात मोठी यात्रा असलेल्या आषाढी यात्रेला आषाढ प्रतिपदेपासून सुरवात

आषाढ द्वितीयेला शुभ दिवसाचा मुहूर्त पाहून ०४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते विधिवत पूजा

देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता दररोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार

पंढरपूर : आषाढी वारीच्या महासोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक मजल दरमजल करत विठुनामाच्या गजरात पंढरीकडे येऊ लागले आहेत. पालखी सोहळे पंढरीत पोहचण्या अगोदरच गर्दी वाढू लागली आहे.आषाढी वारीचा मुख्य सोहळा 12 जुलै रोजी साजरा होत आहे. वारीकाळात अधिकाधिक भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी आजपासून 24 तास दर्शन दर्शन सुरू करण्यात आले आहे.

आज सकाळी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करून पलंग काढण्यात आला. त्यानंतर देवाला मखमली गादीचा लोड देण्यात आला. प्रक्षाळ पूजेपर्यंत देव आपल्या भक्तांना दर्शनासाठी 24 उभा असतो.

या काळात देवाची सकाळी नित्यपूजा दुपारी नैवद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी देण्यात येते. त्यामुळे यात्राकाळात देवाचे नित्योपचार आणि पोशाख बंद राहतात. देवाचे 24 तास दर्शन सुरू झाल्याने दर्शनाचा वेग वाढला आहे.प्रतितास 2 हजार 400 या प्रमाणे दिवसात 45 ते 48 हजार भाविकांना विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाचा लाभ होईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम आदी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: