पंकजा मुंडेंचे मन वळविण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली, विनोद तावडेंनी घेतली भेट

मुंबई ।  बीड विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून आहे. त्यांनी लिहलेल्या फेसबुक पोष्टमुळे या शक्यतेला बळ मिळत आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपा हे नावदेखील हटविले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे येत्या 12 डिसेंबरला स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी काय निर्णय घेतात याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. मात्र भाजपाकडून पंकजा मुंडे यांचे मन वळविण्याचे जोरदार प्रयत्न होत असल्याचे या भेटीवरून जाणवत आहे. याआधी बबनराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती तसेच त्यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणीदेखील लोणीकर यांनी केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: