नांदेड : आज नांदेड मध्ये नवीन आठ कोरोना रुग्ण पॉजीटिव्ह सापडले असून कोरोना ग्रस्तांनी द्विशतक ओलांडले असूूून एकूण रूग्ण संख्या २०३ झाली आहे.
आजच इतवारा :५, मालेगाव रोड: १, सिडको: १, वसमत येथील मयत बाधित
(काल रात्रीचे दोन नवीन रूग्ण: चौफाळा, आणि तकबिड ऐवजी लहुजी नगर, सिडको येथील आहेत.
आज दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
इतवारा हनुमान चौक येथील वृद्ध व्यक्तीचा सकाळी आणि वसमत येथील बाधित रुग्णाचा दुपारी मृत्यू झाला आहे. इतवारा येथील अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला. वसमत येथील रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला.
एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला अन दुसरीकडे रुग्ण वाढत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून कोरोनाला रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलावी पण तसे होताना दिसत नसल्याचे नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे .