नळदुर्ग किल्यातील तलावात बोट बुडाली तीन बालकांचा मृत्यू

 ग्लोबल न्यूज नेटवर्क
नळदुर्ग: नळदुर्गच्या किल्लयात बोटींग करीत असताना बोटी मध्ये समोर लोढ झाल्याने बोट पलटी होवून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 20 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील बोरी नदीच्या पात्रात घडली. दरम्यान या तीन जणांमध्ये दोन  मुलींचा व एका मुलाचा समावेश आहे. दरम्यान या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, एहसान नय्यरपाशा काझी यांनी आपले नातेवाईक यांना घेवून किल्ल्यातील नदीपात्रात बोटींग करण्यासाठी गेले होते. दरम्यान बोट मध्ये बसून बोटींगचा आनंद घेत असताना बोटी मध्ये समोरच्या बाजूला लोढ झाल्याने पाठीमागून बोट पलटी झाली. दरम्यान ही दुर्घटना होताच किल्ल्यातील उपस्थीत आसलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून सात जणांना बाहेर काढण्यात यश मिळविले. तर बोटीतील सानीया फारोक काझी वय 7, इजान एहसान काझी वय 5 रा. नळदुर्ग चुलत बहीण भाउ पाण्यात बुडून मृत्यू पावले तर यामधील अलमाज शफीक जहागिरदार वय 12 रा. मुंबई ही जीवंत आसताना तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले आसता ती रुग्णालयात मरण पावली अशी माहीती मिळाली. दरम्यान या घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तर या वेळी उपविभागीय दंडाधिकारी निलम बाफना या ही घटनास्थळी दाखल होवून त्यांनी ही घटनेची माहीती घेतली.
या घटनेत बचावलेल्या सात जणां पैंकी अलमाज शफीक जहागिरदार या मुलीचा श्वासोश्वास चालू आसताना तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते दरम्यान तिला या ठिकाणी आर्धा तास उपचार मिळू शकला नाही शिवाय या रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी ही आर्धा तास उशीरा आल्यामुळे उपचार मिळू शकला नसल्याने अलमाज जहागिरदार हिचा मृत्यू झाला. या मुळे संतप्त नातेवाईकांनी या संबंधी दोषी आसणाऱ्या वैदयकीय अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवदेन मयतांच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलिस आधिकारी यांना दिले आहे. या घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली असून जिल्हा आरोग्य आधिकारी यांना या घटनेची माहीती देवून संबंधीत वैदयकिय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस आधिकारी संदीप घुगे यांनी नातेवाईकांना दिले आहे.

admin: