‘नटरंग’सारखे हातवारे आम्ही करत नाही, पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्याचे प्रत्युत्तर

जळगाव | विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील राजकारण तापले आहे. प्रचारसभांचा धडाकाच सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. आता जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नटरंग’सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नाही, असं म्हणत फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. या टीकेला पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील सभेत शरद पवार यांनी उत्तर दिले होते. ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही’ असं म्हणत पवारांनी हातवारे केले होते. त्यांच्या या टीकेची राजकीय वातावरणात बरीच चर्चा झाली. यानंतर शरद पवार यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जळगावमधील सभेमधून प्रत्युत्तर दिले आहे. ‘नटरंग’सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नसल्याचे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस पेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट झाली आहे. पवारांच्या पक्षामध्ये कुणीच राहायला तयारी नाही. आधे उधर जओ, आधे इधर जाओ और कोई बचे तो मेरे पिछे आओ अशी अवस्था पवार यांची झाली आहे.

यामुळे एवढी वर्षे महाराष्ट्रात काम केलेले राष्ट्रीय नेते पवारांना आता पराभव दिसू लागला आहे. यामुळेच त्यांची विवेकबुद्धी कमी व्हायला लागल्याचे ते म्हणाले. म्हणून पवार साहेब कशा प्रकारे हातवारे करून बोलत आहेत हे आपण बघितले असल्याचे फडणवीस म्हणाले. उत्तरं आम्हालाही देता येतात. पण असे हातवारे आम्ही कधी नसल्याचे फडणवीस म्हणाले.

आम्ही नटरंगसारखं काम कधी केलं नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नसल्याचे ते म्हणाले. कोण पैलवान आहे, कुणाला विजय मिळाला, हे सर्व जनताच 24 तारखेला दाखवेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: