अखेर राष्ट्रवादी च्या या उमेदवाराने दिला अपक्ष उमेदवाराला पाठींबा

करमाळा: करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी अखेर अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय शिंदे यांना पाठिंबा दिला तरी, पक्षाकडून देण्यात आलेले अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर हे माघार घेण्यास तयार नव्हते.


पण आज रविवारी करमाळा तालुक्यातील वीट येथील भर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर यानी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिंदे यांना यापूर्वीच माजी आमदार जयवंत जगताप यांनी ही पाठिंबा दिला आहे. शिंदे यांच्या सोबत विद्यमान आमदार नारायण पाटील हे ही अपक्ष उभे आहेत, तर रश्मी बागल या शिवसेनेच्या उमेदवार आहेत.


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: