धसका कोरोनाचा | रेल्वेने रद्द केल्या ३५० पेक्षा जास्त ट्रेन, १७ ट्रेनचे बदलले मार्ग

धसका कोरोनाचा | रेल्वेने रद्द केल्या ३५० पेक्षा जास्त ट्रेन, १७ ट्रेनचे बदलले मार्ग

IRCTC Cancelled Trains List Today: नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने (Indian Railway)देशभरातील जवळपास ३६० गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही ट्रेनच्या मार्गात बदल करून त्यांचे रिशेड्यूलिंग करण्यात आले आहे. रेल्वे विभाग दररोज बदल करण्यात आलेल्या किंवा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती जाहीर करत असते. त्यामुळे तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वे गाड्यांची माहिती करून घ्या. (Indian Railway cancelled more than 350 trains)

रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यात ३४६ ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर २० ट्रेनना अंशत: रद्द करण्यात आले आहे. रेल्वे १७ गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. तर १३ गाड्यांचे रिशेड्युलिंगदेखील केले आहे. देशातील कोरोना संक्रमण आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गामुळे रेल्वे प्रवाशांना कोरोना निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. रेल्वेकडून प्रवाशांना रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक तपासण्याचीही सूचना करण्यात येते आहे. त्यामुळे तुम्हीदेखील जर प्रवासाचे नियोजन करत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक नक्की तपासा.

गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का यावर चर्चा सुरू होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी पुन्हा लोकल बंद होणार का याबाबतही चर्चा सुरू होती. अखेर राज्यात लॉकडाऊन लागणार नाही आणि मुंबई लोकलही बंद होणार नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई लोकल बंद करण्याचाही कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले. आहे ते निर्बंध अधिक कसे कडक करता येतील जेणेकरून लोक गर्दी करणार नाही आण कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यावर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊनबद्दल कुठलाही विचार झालेला नाही, निर्बंधाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाढ होऊ शकेल. निर्बंध लादताना यासंबंधित लोकांशी आणि टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आता गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस पॉझिटिव्ह येत असल्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पोलिसांना घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यांना ड्युटीवर येण्याची गरज नाही. जे पोलिस पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय सुविधा मिळत राहतील. पाटील म्हणाले की, शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: