गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव, पवारांनी उदयनराजेंना लगावला टोला

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिलाय त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. निवडणुकीत महाआघाडीच्या सर्व घटकांनी मनापासून प्रयत्न केले. प्रत्येक कार्यकर्त्याचे मी अंतःकरणपूर्वक आभार

या विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांकडून जे सांगण्यात आले की ‘अबकी बार २२० पार’, हे लोकांनी स्वीकारलेले नाही. सत्तेचा उन्माद जनतेला पसंत पडलेला नाही. सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात, हे या निकालावरून लक्षात येते.

निवडणुकीत किती टोकाची मतं मांडायची याला काही मर्यादा असते. पण यावेळी प्रचाराची सीमा विरोधकांकडून ओलांडली गेली. जे पक्ष सोडून गेले आणि निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उभे राहिले, त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला नाही, हे स्पष्ट झालंय.

आज लोकसभेचीही पोटनिवडणूक होती. श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदीय सदस्य होते. संसदीय कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना सातारकरांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल लवकरच मी स्वतः जाऊन सातारकरांचे आभार मानणार आहे.

दिवाळीनंतर पक्षाच्या वतीने सर्व उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. निवडणुकीनंतरची धोरणात्मक आखणी त्यानंतर केली जाईल. जनमत पाहता अधिक जोमाने काम करून नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. दिवाळी झाल्यावर यासंबंधीची वाटचाल करण्यात येईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: