दौंडची आवक 50 हजार क्युसेक, उजनीतून 46600 चा विसर्ग

पंढरपूर- भीमा खोरे व घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने दौंडची आवक वाढत चालली असून रविवारी सकाळी 49 हजार 700 क्युसेक पाणी उजनी जलाशयात मिसळत होते. यामुळे धरणातून भीमेत 45 हजार क्युसेक पाणी सांडव्यातून तर 1600 क्युसेक वीजनिर्मितीसाठी सोडले जात होते. यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

नीरा साखळी धरणांवर पावसाचा जोर असल्याने वीरमधून काल 13 हजार व नंतर सायंकाळी 4500 क्युसेक पाणी सोडले जात आहे. वीर व उजनीच्या पाण्याने भीमानदी संगमच्या पुढे पन्नास हजार क्युसेकने वाहण्याची शक्यता असल्याने सर्व बंधारे व पंढरीतील दगडी पूल पाण्याखाली जाईल.

उजनी धरण क्षमतेने भरल्याने येथे पाणी साठवणूक करण्यास जागा नाही. कॅनॉल, वीज निर्मिती, बोगदा, सीना माढा यासह दहिगाव योजनांमध्ये पाणी सोडले जात आहे. 

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: