दहशतवादा विरोधात आपण एकत्र लढू, मोदींचा श्रीलंकेला शब्द

ग्लोबल न्यूज नेटवर्क: पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत. मालदीव आणि श्रीलंका या दोन शेजारील देशांना भेट देऊन मोदींनी आपल्या दुसऱ्या टर्मच्या विदेश दौऱ्यांना सुरवत केली आहे. मालदीव दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज श्रीलंका दौऱ्यावर पोहोचले आहेत. तर श्रीलंकेत दाखल होताच मोदींनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.यावेळी ते माजी राष्ट्राध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते महिंद्रा राजपक्षे यांचीही भेट घेतील. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दहशतवादाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले.

दरम्यान ईस्टर संडेच्या दिवशीच श्रीलंका बॉम्बस्फोटाने हादरले होते. श्रीलंकेच्या राजधानी कोलंबो येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात २५० लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ११ भारतीय नागरिकांचाही समावेश होता.

admin: