ते चेअरमन झाले अन बाजार समितीचा चेहरामोहराच बदलला.. वाचा सविस्तर-

शेतकरी व युवकांच्या हितासाठी झटणारा युवा नेता रणवीर राऊत

बार्शी : शालेय जीवनापासूनच अंगी असलेला संघटन कौशल्याचा गुण, नियोजनबध्द काम, मोजकेच बोलणे ,लोकांमध्ये मिसळण्याचा स्वभाव आदी गुणांमुळे रणवीर राऊत यांनी सलग तीन वेळा राज्यातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यापीठ प्रतिनिधी (युआर ) म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप तर पाडलीच आहे परंतू कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बाजार समितीच्या निवडणुकीत उतरून विक्रमी मताने विजय मिळवून राज्यातील एका नामांकित अशा कृषी उत्पन्न बाजार समितीचा तरुण सभापती होण्याचा मान मिळवला आहे़ आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात रणवीर राऊत यांनी बाजार समितीचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहराच बदलून टाकला आहे.

बार्शी तालुक्याच्या राजकारणात राजेंद्र राऊत यांचा १९९६ च्या काळात उदय झाला, त्यांनी राजकारणात संघर्ष करत आमदारकी, पंचायत समिती, नगरपालिका व आता बाजारसमिती अशी सत्ताकेंद्रे आपल्या घेतली़ त्यांच्या गटाकडे स्वत: राजेंंद्र राऊत हेच या गटाचे नेत्वृत्व करीत आहेत़ त्यांनी शहराचे नगराध्यक्षपद व आमदार पद भूषविले आहे़ ते लक्ष्मीसोपान बाजार समितीचे चेअरमन आहेत़ त्यांच्या मदतीला त्यांचे छोटे बंधू विजय राऊत हे देखील नगरसेवक म्हणून काम पहात आहेत.

बंधू अभिजित राऊत व चुलत्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कांही निवडणुकांपासून राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत हे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. युवक वर्गात त्यांची मोठी क्रेझ असून त्यांनी शिवाजी महाविद्यालयाचे यु आर म्हणून देखील आपल्या कामाची छाप पाडली आहे़ते मागील वर्षी सलग तिसऱ्यादा महाविद्यालयाचे युआर झाले आहेत़ राज्यशास्त्राची पदवी घेऊन ते आता विधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

शिवाय गेल्या कांही वर्षातील जि़प़ व पं़स़ च्या निवडणुकात ही रणवीर राऊत यांनी त्यांच्या युवा सहकाºयांच्या जोरावर उपळाई ठोंगे जि़प़ गटाची जबाबदारी सक्षमपणे पेलून त्या गटात राऊत गटाचा उमेदवार मोठ्या विक्रमी मतांनी विजयी करण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे.आता विधानसभा निवडणुकीत ही ते महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन राजाभाऊ ना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

त्यांच्या माध्यमातून राऊत गटाकडे युवकांचा ओढा वाढला असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे़ मागील काही महिन्यापुर्वी भाऊसाहेब आंधळकर व राऊत गटात झालेल्या सोशल मिडीयावरील वादात देखील रणवीर व त्याची टीम ही आक्रमकपणे किल्ला लढवत होती़ रणवीर राऊत यांची युवक वर्गात कार्यकर्त्यात असलेली के्रझ व मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राऊत यांनी त्यांना बाजार समिती निवडणुकीत जामगाव गणातून उमेदवारी दिली व ते मोठ्या मताधिक्याने निवडुण आले व त्यांच्यावर सर्व संचालकांने त्यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी टाकली आहे ते आता ते सक्षमपणे पार पाडत आहेत.

रणवीर हे एका शेतकºयाच्या कुटुंबातील असल्याने त्यांनी आपले पिता राजाभाऊ यांच्या बरोबर राहुन पश्चिम महाराष्ट्रातील खाजगी तत्वावर स्थापन झालेल्या लक्ष्मी सोपान अ‍ॅग्रो प्रोड्युस मार्केट कंपनीचा कारभार पाहीलेला आहे त्यांनी नेहमी शेतकरी हित जोपासत शेतीमालाला नेहमीच योग्य ते भाव देण्याचे काम केले त्यांनी बाजार समीतीचे सभापती पदाचे सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावली वैराग येथील बाजार समितीस ज्यांनी शेतकºयासाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा कै चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे नाव देवुन कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस संपुर्ण जमिन दिली त्या आमदार नरसिंग मास्तर देशमुख यांचे नाव शेतकरी भवनास देवुन त्यांच्या कार्यास उजाळा दिला़ बाजार समितीमध्ये सध्या कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे सुरु आहेत़ शेतकरी, आडते, व्यापारी ,हमाल-तोलार या सर्वघटकांना विश्वासात घेऊन कामकाज सुरु आहे़ हमाल व तोलारांसाठी घरे बांधून देण्याच्या कामाचे ही नुकतेच भूमिपुजन केले आहे़ तर बाजार समितीच्या माध्यमातुन शहर व ग्रामिण भागातील गरीब गरजु विदयाथ्यार्साठी वस्तीगृह बनविण्याचा रणवीर भैय्याचा मानस आहे.

रणवीरभैय्याने वडील राजेंद्र राऊत यांचा राजकारणातील समाजकारणातील संघर्ष जवळुन पाहीलेला आहे आणि याच संघर्षमय जीवनातुन लहानपणापासून रणवीर भैय्याने समाजकारणासह राजकीय धडे घेतलेले आहे तसेच रणवीर यांच्या मातोश्री सौ कविताताई राऊत हयादेखील राजेंद्र राऊत यांच्या संघर्षमय जीवनामध्ये प्रत्येक क्षणी खंबीरपणे साथ देऊन रणवीर भैय्या यांना घडवले आपल्या पतीच्या राजकीय सामाजीक संघषार्चा परिणाम आपल्या दोन्ही मुलावर होवु दिला नाही.

त्यांनी रणवीर व रणजीत या दोन्ही मुलांना आतिशय संस्कारपुर्ण वातावरण देऊन घडवली आहेत त्यामुळेच कविताताईनी दिलेले संस्कारमय शिकवण आणि वडील राजेंद्र राऊत , चुलते विजय राऊत, संजय राऊत यांनी दिलेले गोरगरिब , शेतकºयांसह सर्व जातीधर्माना सोबत घेऊन समाजकार्य करण्याचे धडे यामुळे रणवीर भैय्याना राजकारण , समाजकारणात उज्ज्वल भविष्य आहे रणवीर भैय्यांना वाढदिवसाच्या व भावी वाटचालीस शुभेच्छा.

लेखक
संदीप मिरगणे व शंतनू पवार बार्शी

ग्लोबल न्युज नेटवर्क: