तुकोबारायांच्या देहू संस्थानचा 11 लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

पुणे– सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात तेथे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मदतीला सारा महाराष्ट्र धावून आला आहे. अशा वेळी संत देवस्थान असणारी श्रीक्षेत्र आळंदी व देहू संस्थानच्या वतीने ही मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जगतगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अकरा लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

मुंबईत तो ह.भ.प.मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजय मोरे, विशाल मोरे यांनी हा धनादेश दिला.

तर आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. हा धनादेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास ढगे यांनी सुपुर्द केले आहेत.

प्रत्येकी पाच लाख रूपये कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून वापरले जावेत अशी अपेक्षा संस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहेत. महापूर आल्यानंतर राज्यभरातील अनेक देवस्थानांनी सढळ हाताने शासनाकडे मदत पोहोच केली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराने ही 61 लाख रूपयांचे अर्थसहाय्य केले आहे तसेच माता रूक्मिणीच्या 5 हजार साड्या पूरग्रस्त भागातील भगिनींना दिल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: