ती बघ किती छान…नक्की वाचा..

खुप छान लेख आहे…

    लेखिका  अर्चना_पाटील.

ती बघ किती छान

सकाळी चहाचा घोट घेत गॅलरीत संतोष उभा होता , बाजूचा विंग मधील अवणीला कामाला जातांना पाहून आपली बायको सुरेखा ला म्हणाला ,” काही पण म्हण पण या अवनी वहिनी ना मानलं पाहिजे , सकाळी 8 च्या ठोक्याला मस्त तयार होऊन कामाला जातात , रोज नवीन ड्रेस तो पण कडक इस्त्रीतील ..कसं त्यांना पाहिलं की प्रसन्न वाटत , तुझाच वयाचा असतील ना त्या .

सुरेखा चा हातात झाडू होता ,घर आवरता आवरता ,ती हो म्हणाली .संतोष ने कप तिथंच ठेवला ,आणि चला मला उशीर होतो म्हणत अंगोळीला गेला .

सुरेखाला कळलं होतं की संतोषला काय अपेक्षित आहे .दोन चार दिवस गेले .संतोष ऑफिस ला निघाला ,डबा तयार आहे का ,सुरेखा धावतच डबा घेऊन आली , डबा बॅगेत ठेवत संतोष म्हणाला आज माझे ऑफस चे सिनिअर घरी येणार आहेत … जरा नीट आवरून बस …नाहीतर जेव्हा बघावं तेव्हा तो डोक्यावर केसांचा गुंडाळा केलेला आणि तो पीठ आणि तेलाचे हात पुसलेला गाऊन . सतत थकलेला चेहरा .आणि बोलण्यात जरा आत्मविश्वास पण येऊ द्या .

सुरेखा पुन्हा हलक्या सुरात हो म्हणाली .तस पाहता सुरेखा उच्चशिक्षित परंतु तिला बाहेर पडण्याची संधीच कधी मिळाली नाही घड्याळाचा काटा सरकायचा तो इतरांना वेळ

देण्यासाठी …घर,कुटुंब ,नवरा ,मुलं ,नातेसंबंध याना न्याय मिळावा म्हणून घरातील काम व जबाबदारी यातच गुंतलेली असायची …स्वतःला ही वेळ द्यायचा असतो हे ती विसरलीच होती…हे ती आनंदाने करत होती पण ती त्या चार भिंतीत इतकी गुरफटली होती की बाहेर पडणं तिला शक्य वाटत न्हवत .

संतोष चे जस जसे प्रमोशन होत गेले तस तस इतर बाहेर पडणाऱ्या महिलांना पाहून आपली बायको ही अशीच व्हावी असं सतत त्याला वाटू लागलं …त्या साठी तो तिला नवीन ड्रेस ,साड्या आणून ही देत होता …पण कुठं जायचं नाही घरात तर रहायचं म्हणून ती त्या कपटातच ठेवत होती .

संतोष तिचा राहणीमान आणि तिच्या कमी आत्मविश्वास यावर सतत बोलू लागला ..ती ला ही कळत होतं पण करायचं काय हा प्रश्न होता .

एके दिवशी अवनी सुरेखाच्या घरी पूजेच अमंत्रण द्यायला आली …सुरेखाने तिला चहा दिला …सुरेखाच नीट नेटकं सजवलेलं घर बघून अवणीच्या मुखातून सहज निघालं ..wow काय घर ठेवलं आहे तू ,मस्तच .आणि ही पेंटिंग किती सुंदर ,कुठून आणलीस …सुरेखाम्हणाली मी बनवली आहे ती .अवनी अरे वाह ,खूपच छान .

सुरेखाने थोडं घाबरतच अवणीला विचारले ताई एक विचारू का ? तुम्ही रोज इतक्या टापटीप कशा राहता ..घरात कामाला बाई आहे का ? आणि मुलं ? अवनी म्हणाली मला एक मुलगी आहे आणि घरात कामाला बाई नाही …आणि राहिला प्रश्न टापटीप राहण्याचा ..मला कामा निमित्त बाहेर पडावे लागते ,चार लोक भेटतात मग त्यांच्या समोर जायचं म्हणजे व्यवस्थित राहावच लागत .

अवनी तितकं बोलून ,तिथून निघून गेली …सुरेखा ने मात्र स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवलं …तीन आज पटापट काम आवरले आणि घराला कुलूप लावून बाहेर गेले ..मुलं आणि नवरा गेला की ही रोज आता दुपारच्या वेळेला झोपण्या ऐवजी बाहेर पडत होती ..संतोष आणि मुलांना काही माहीत न पडू देता .

महिना होत आला सुरेखाच्या वागणं ,बोलणं आणि राहणीमानात संतोष ला थोडा फरक जाणवू लागला होता ..ती बाहेर जाते हे कोणालाही माहीत न्हवत असेच तीन महिने गेले ..

एके दिवशी संतोष च्या इमेल वर एक invitation आलं … International award ceremony चे…नेहमी प्रमाणे त्याने मस्त तयारी केली आणि सुरेखाला म्हंटला आज थोडा उशीर होईल घरी यायला ,ऑफिस चे काम झाले की एका बड्या कर्यक्रमाला जायचं आहे ..तुला घेऊन गेलो असतो पण तिथं खूप मोठं मोठी माणसं येणार आहेत आणि तुला त्यांच्या समोर बोलता नाही आलं तर .
सुरेखा ने नेहमी प्रमाणे फक्त हो मान हलवली .

संतोष कामाला गेला ..संध्याकाळी संतोष त्या कार्यक्रमच्या ठिकाणी पोहचला ,अवनी वहिनीला तिथं बघून ,अरे वाह वहिनी तुम्ही इथं ..अवनी हो आमच्या कंपनीनेच हे arrange केलं आहे …कार्यक्रम सुरू झाला मोठं मोठ्या हस्ती उपस्थित होत्या ..एक एक पुरस्कार जाहीर होत होता आणि announcement झाली “First Prize winner is Surekha Santosh Pandit ”

संतोष क्षणासाठी अवाक झाला ..स्टेज वर एक सुंदर ,केस मोकळे सोडलेले , चालण्यातील आत्मविश्वास असणारी ती स्त्री दुसरं तिसरं कोणी नसून त्याची बायको सुरेखा होती …त्याला आनंद झाला आणि तो चकित ही झाला..त्या क्षणी मिश्र भावना होत्या त्याच्या .

कार्यक्रम संपला दोघे घरी आले ..संतोष ने सुरेखा ला विचारलं मॅडम सरप्राईज छान होत पण हे कसं घडलं .

सुरेखा ने हातातील बांगड्या काढत सांगितलं की , तुम्ही नेहमी राहणीमान आणि आत्मविश्वास या बद्दल जे सांगण्याचा प्रयत्न करत होतात ते मला कळत होतं पण मग कसं करायचं यात मात्र माझा गोंधळ होत होता .

त्या दिवशी अवनी ताई घरी आल्या नसत्या तर हे शक्य न्हवत , त्यांनी मला ही दिशा दाखवली …आपल्या आवडीच्या कामाला वेळ दयायला सांगितला ..तुमच्या मागे मागील 3 महिने मी एका पेंटिंग च्या क्लास ला जात होती जमवलेले पैसे फी साठी वापरले ..दुपारची झोप बंद केली …बाहेर पडावं लागत होतं म्हणून तुम्ही आणलेले ड्रेस ही वापरले जात होते ..चार लोक तिथं भेटत होते म्हणून नवनवीन माहिती व स्वतःतील आत्मविश्वास वाढत होता .

त्यातच माझी कला पाहून अवणीने तिच्या कंपनी द्वारे या आंतरराष्ट्रीय पेंडिंग स्पर्धा मध्ये माझा सहभाग नोंदवला ..या बक्षिसा साठी मी अवणीची आभारी आहे थँक्स टू अवनी .

अग पण मला का नाही सांगितलं तू हे , संतोष म्हणाला ..
सांगितलं असत तर असं surprise मिळालं असतं का ???

अहो , अवणीचे ते शब्द अजून ही माझ्या लक्षात आहेत …,” घराकडे लक्ष दिलं तर स्वतःकडे दुर्लक्ष होतं ,आणि स्वतः कडे लक्ष दिलं तर घरा कडे दुर्लक्ष ” पण दोघांच्या कडे लक्ष द्यायच असेल तर आपल्या आवडीच्या कामासाठी स्वतःला वेळ दे म्हणजे बघ कसं जमत ते सर्व .” आणि खरंच ते शक्य झालं .

तेव्हा मैत्रिणींनो ,सुरेखा सारख्या अनेक महिला आहेत ज्यांनी आज ही स्वतःला अडकवून ठेवलं आहे ..कोणी बोलतंय म्हणून नाही की कोणाला दाखवायला नाही तर स्वतःला सिद्ध करायला व स्वतःचा आत्मविश्वास वाढायला थोडं तरी या चार भिंतींच्या चौकटीतून बाहेर पडा .

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: