झटका कोरोनाचा: सोलापूर चे पालकमंत्री बदलले ;आता यांची केली नियुक्ती

सोलापूर : कोरोना विषाणूने सर्वत्र ठीक
थैमान घातले असताना सुद्धा पालकमंत्री सोलापूर कडे न फिरकल्याने त्यांचा बळी गेला आहे.सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी नवे पालकमंत्री म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापुरात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत आहेत. राेजगार बंद असल्याने गोरगरीबांना धान्य मिळत नाही. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनात समन्वय नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे याकडे लक्ष नसल्याची टीका विरोधी पक्षातून होत होती.मीडिया मधून ही टीका होत होती.

काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: