झंझावात हा शब्द नारायण राणे यांना बरोबर शोभतो- नितीन गडकरी

नारायण राणेंच बाळासाहेब ठाकरेंवर नितांत प्रेम होतं असही गडकरी म्हणाले.
नारायण राणेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; शरद पवारांची प्रमुख उपस्थिती

मुंबई । नारायण राणे यांचं आत्मचरित्र असलेल्या झंजावात या पुस्तकाचं प्रकाशन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार, निलेश राणे आदी मान्यवर राजकीय नेते उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, झंझावात हा शब्द नारायण राणे यांना बरोबर शोभतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते मुख्यमंत्री झाले हाच त्यांचा झंझावात आहे. नारायण राणे मंत्री असताना मी ही मंत्री होतो. मात्र राणे कॅबीनेटमध्ये नेहमीच इतरांपेक्षा वेगळं बोलायचे. राणेंचा आणि माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे. राजकारणातील मैत्री ही त्या व्यक्तीशी नसते तर ती ज्या पदावर आहे त्यावर असते. मला राजकारणात मोठी-मोठी पद मिळाली असतील मात्र माझे दोन नेते आहेत ते म्हणजे नारायणराव राणे आणि गोपीनाथ मुंडे त्यांना विसरुन चालणार नाही.

गडकरी पुढे म्हणाले की,  नारायण राणे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम होतं आणि मी ज्यावेळी बाळासाहेब यांना भेटायचो त्यावेळी बाळासाहेब यांचेही राणे यांच्यावर खूप प्रेम होतं हे कळायचं. माणूस रणांगणावर पळून गेला की तो हरतो मात्र त्याच राणांगणावर हरला तरी तो संपत नाही आणि राणे यांनी कधीही शरणागती पत्करली नाही.

कोकणातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक मुलगा शिक्षण घेतो. त्यानंतर काही काळ नोकरी करतो. त्यानंतर सामाजिक, राजकीय जिवनात सक्रीय होतो. शिवसेना या पक्षात 39 वर्षे, कॉंग्रेस पक्षात 12 वर्षे राहिल्यानंतर स्वतःचा राजकीय पक्ष काढून राजकारण करतो. हा सर्व कालखंड या आत्मचरित्रात आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अनेकांच्या आठवणी आहेत. अनेक राजकीय घटनांवर प्रकाशझोत या आत्मचरित्रात टाकण्यात आला आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्षाने दिलेले सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो, असे दिलेले आश्‍वासन या घटनेचा उल्लेख केला आहे. शिवसेनेत असताना मातोश्री आणि राणे यांच्यात झालेल्या अनेक घटनांचा संदर्भ राणे यांच्या आत्मचरित्रात असल्याचे समजते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: