जीवनावश्यक वस्तू, किराणा व औषध दुकाने २४ तास सुरु ठेवण्यास परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

ग्लोबल न्यूज : कोरोनाच मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन लागू केला आहे. या कालावधीत नागरिकांची जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य आणि औषधे मिळविण्यासाठी गैरसोय होऊ नये, या करिता राज्यातील जीवनावश्यक वस्तू, औषध दुकाने २४ तास सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

या मुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान,जीवनावश्यक वस्तू, किराणा मालाची दुकाने, औषध विक्रीची दुकाने आणि जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी स्वच्छतेचे निकष पाळावेत. नियमित जंतुनाशक फवारणी व ग्राहकांसाठी सॅनिटायझरची उपलब्धता तसेच सोशल डिस्टंसिंग आदींचे काटेकर पालन करणे बंधनकारक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: