अखेर १ ऑगस्ट पासून बार्शीतील कारी उस्मानाबादमध्ये समाविष्ट होणार


धीरज करळे/गणेश भोोळे

बार्शी : बार्शी तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या कारी गावाचा समावेश १ ऑगस्ट पासून उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे कारी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कारीतील गावकरी गाव उस्मानाबाद जिल्ह्यात जावे म्हणून प्रयत्न करत होते. त्याला अखेर ३१ मे रोजी शासनाने राजपत्र काढत कारीचा समावेश १ ऑगस्ट पासून उस्मानाबाद जिल्ह्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे. याधी ३० जून रोजी शासनाने परिपत्रक काढून गाव समाविष्ट होणे व त्यावर हरकती मागवल्या होत्या. त्यानंतर गाव १ जानेवारी २०१९ पासून उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे याची तारीख लांबणीवर पडली होती.

गावातील विजयसिंह विधाते यांच्यासह अनेकांनी गाव समिविष्ट होण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्रामपचायतीचा ठराव मुख्यमत्र्यांपासून ते महसूल मंत्री, मंत्रालय सचिव, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. कारी गावाला उस्मानाबाद शहर हे १८ किमी तर सोलापूर शहर हे १०० किमी होते. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हणले की संपूर्ण दिवस जाता होता. त्यातच काम नाही झाले तर रिकाम्या हाताने परत यावे लागत होते. परंतु आता १७ किमी असणाऱ्या उस्मानाबादला जाऊन यायला संपूर्ण दिवस खर्ची घालण्याची गरज पडणार नाही. यासह शेतकऱ्यांना मिळणारा विमा, विद्यार्थ्यांच्या शाळेची कागदपत्रे काढण्यासाठी जिल्ह्याचे ठिकाण आता सर्वांना जवळचे पडणार आहे.

admin: