▪ मेष – नवीन नाती : या आठवडय़ात काही जुने हिशेब मार्गी लागतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. घरात भरपूर पाहुणे येतील. यातून हितसंबंध सुधारतील. घरातील गृहिणीवर कामाचा ताण पडेल. लाल रंग जवळ बाळगा. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रेमात यश मिळेल.
▪ वृषभ- शुभ आठवडा : संकष्टी चतुर्थी अत्यंत लाभदायक आहे. उपवास अवश्य करावा. जमिनीची कामे मार्गी लागतील. व्यवहार याच आठवडय़ात करून घ्या. जोडीदाराची साथ नेहमीप्रमाणेच लाभदायक असेल. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील.
▪ मिथुन – ज्येष्ठांची मदत : मनाप्रमाणे गोष्टी झाल्याने मनास प्रसन्नता लाभेल. घरातील ज्येष्ठांचा मान राखा. महत्त्वाच्या कामात त्यांचा सल्ला आवर्जून विचारात घ्या. काही अडचणीचे प्रसंग येतील. त्यांच्या पाठिंब्यानेच सुटण्यास मदत होईल.
▪ कर्क – मेहनतीचे फळ मिळेल : अनपेक्षित धनलाभ होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. वादविवादाचे प्रसंग उद्भवतात पण परिस्थिती व्यवस्थिती हाताळा. महत्त्वाचे निर्णय याच आठवडय़ात घ्या.
▪ सिंह- मदत करा : सध्या कालावधी तुमचा कस पाहणारा असेल. इथे तुमचा स्वभाव कामी येईल. अनेक लोकोपयोगी कामे हातून घडतील. दुसऱ्यांना मदत करण्याची संधी अजिबात सोडू नका. प्रेमवीरांसाठी परीक्षेचा कालखंड.
▪कन्या – प्रकृतीची काळजी घ्या : थोडा वेळ स्वतःसाठी द्या. त्यामुळे मनास प्रसन्नता येईल. चांगले साहित्य वाचाल. घरातील देवांची पूजा मनःपूर्वक करा. मनोकामना पूर्ण होतील. आपल्या पूर्वजांची आठवण आवर्जून काढा.
▪ तूळ – फिरण्याचा आनंद घ्या : या आठवडय़ात अतिशय उत्तम कलाकृतीचा आनंद घ्याल. बाहेर फिरण्याचा योग आहे. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ मजेत जाईल. त्यातून भावनिक बंध मजबूत होतील. त्यामुळे खुश राहाल.
▪ वृश्चिक – प्रसन्न वातावरण : तब्येतीतील सुधारणा मनास उभारी देऊन जाईल. घरातही वातावरण प्रसन्न राहील. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तरुणाईसाठी आठवडा खूप आशादायक असेल. खेळात प्रावीण्य मिळवाल.
▪ धनु – यश प्राप्ती : स्वच्छ मनाने केलेल्या कामाला नेहमीच यश मिळते. या आठवडय़ात काहीसा असाच अनुभव तुम्हाला येईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. कर्मयोगावर विश्वास ठेवा. नवीन नाती जोडली जातील. त्यातून अत्यंत मानसिक समाधान लाभेल.
▪ मकर – महत्त्वाचा निर्णय : अत्यंत समजूतदार आणि परिपक्वता हे तुमच्या राशीचे वैशिष्टय़. तुमच्या याच स्वभावाचा प्रत्यय तुमच्या आप्तेष्टांना येईल. घरातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुमच्याकरवी घेतला जाईल. त्यामुळे फार मोठे संकट टळेल.
▪ कुंभ – प्रेमाचा आठवडा : मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणाल. पण त्यातून कोणाचे मन दुखवू नका. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. कामात थोडीफार घाई संभवते. तरुणाईसाठी प्रेमाचा आठवडा. नव्या व्यक्तीच्या संपर्कात याल. त्यातूनच जीवनाचा जोडीदार मिळेल.
▪ मीन – प्रगतीच्या वाटेवर : अत्यंत धावपळीचा आठवडा. पण निश्चिंत रहा. त्यातून मिळणारे यश नेत्रदीपक असेल. हितशत्रूंपासून सावधान. वादात सापडू नका. तटस्थ रहा. खेळात प्रगती होईल. आहार आणि व्यायाम यांची पथ्ये सांभाळावी लागतील.