जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ठ काम करणाऱ्या
बार्शीतील कृषी सहाय्यक घुगे यांचा लऊळ शिवारात निघृण खून
प्रेत जाळुन पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न
बार्शी ( गणेश भोळे ) गेल्या मंगळवारपासुन बेपत्ता असलेल्या बार्शी तालुका कृषी कार्यालयात कृषी सहायक अंगद सुरेश घुगे वय ४३ यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
माढा तालुक्यातील लऊळ येथील खूनातील मृतदेहाची ओळख पटली असून अंगद सुरेश घुगे असे त्यांचे नाव आहे. अंगद घुगे हे सध्या बार्शीतील कृषी विभागात कृषी सहायक म्हणून कार्यरत होते, ते अतिशय झपाटुन काम करणारे कृषी साहय्यक म्हणून त्यांची ओळख होती. ते मूळचे तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी आहेत.
त्याचा मृतदेह ल ऊळ तामाढा येथे मारहाण करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत जोशी यांच्या मळ्याजवळ एका खडयात काटेरी झुडपात अढळून आला होता लऊळच्या पोलीस पाटील यांनी कुर्डवाडी पोलीसात खबर दिली होती मृतदेहाच्या वर्णनावरुन घुगे यांचे नातेवाईकानां हा मृतदेह अंगद घुगे यांचा असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कुर्डुवाडी पोलीसात धाव घेतली.
घुगे यांचा धारदार हत्याराने डोक्यावर तोंडावर गळ्यावर पोटावर व पायावर वार केले व पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला आहे घुगे यांचा खुनाचे नेमके कारण काय व तो खुन कशासाठी झाला कोणी केला ?हे अदयाप स्पष्ठ झाले नाही अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि . चिमणाजी केंद्रे हे याबाबत शोध घेत आहेत .
.