विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत ते महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. या व्हिडीओबाबत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
धनंजय मुंडे यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेत माझ्यात आणि पंकजा या बहिण भावाच्या नात्यात विष कालवण्यात येत आहे, असा आरोप केला. मी मतांसाठी कधीही राजकारण केले नाही. ही बातमी ऐकून माझी मी जगावे की मरावे अशी मानसिकता झाली आहे असे ते म्हणाले. तसेच अनेकांना मी या पृथ्वीतलावावर नको आहे असे विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे यांनी तो यावेळी व्हायरल होणारा व्हिडीओ एडिट केल्याचा आरोप केला. बहिण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा, नात्याला डाग लावण्याचा ‘नव्या’ भावांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ज्या बहिणीसाठी 2009 ला मी मतदारसंघाचा त्याग केला, आज त्यांच्याकडूनच मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 17 तारखेचे भाषण 19 तारखेला एडिट करून व्हायरल करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.