छत्रपती संभाजी राजेंची विनोद तावडे आणि भाजप सरकारला जोरदार चपराक ; म्हणाले…

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यावर केली आहे.

सांगली -कोल्हापूर भागात कृष्णा, कोयना, पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे लाखो लोक विस्थापित होऊन कित्येकांचे जीव गेले, जनावरे दगावली, शेतीचे कधीही भरुन न येणारे नूकसान झाले़ आता पुराचे पाणी ओसरु लागल्याने किती नूकसान झाले याचा अंदाज येऊ लागला आहे़ या पुरग्रस्तांसाठी राज्याच्या कानाकोपºयातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे़ जो-तो आपल्या परीने मदत करीत आहे.
राज्य सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस आदींसह विविध राजकीय पक्षांनी देखील मदत केली आहे.

हा मदतीचा ओघ सुरू असतानाच भाजप सरकार मधील मंत्री विनोद तावडे हे हातात डबा घेऊन मदतीची भीक मागत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर संभाजीराजे यांनी ही टीका केली आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: