छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारने आज अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर शिरगणती घेण्यात आली. त्यात विश्वासदर्शक ठरावांच्या बाजूने १६९ मतदान झाले. तर भाजपने विश्वासदर्शक ठरावापूर्वीच सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शुन्य मतदान झाले. तर ४ आमदार तटस्थ राहिले. चार तटस्थ आमदारांमध्ये एमआयएमचे दोन, सीपीआय(एम) एक आणि मनसेच्या एका आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात बोलताना म्हणाले की, सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभार मानतो, पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे, छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन अस मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: