छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

आज श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपति महाराजांचा स्मृतीदिन… १९२२ साली आजच्याच दिवशी मुंबई येथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपति शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे “सुराज्य” साकारणाऱ्या या महान छत्रपतीने केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. साहित्य, कला, कुस्ती, शिक्षण,शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत शाहू महाराजांनी अजोड कामगिरी केली आहे. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले, अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली, कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला, ‘शाहू मिल’ ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात कायापालट करणार उपक्रम ठरला. शेतीविषयक धोरणे राबवून त्यांनी आपल्या भागास सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. सर्वार्थाने प्रजेचे हित जपणाऱ्या या लोकराजाचे विचार आणि कार्य आज महाराष्ट्रात अंगिकारले जाण्याची खरी गरज आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!

admin: