चोरीच्या 8 मोटारसायकलीसह मामा भाच्या ला अटक, बार्शी शहर पोलिसांची कामगिरी

चोरीच्या 8 मोटारसायकलीसह दोघांना अटक, बार्शी शहर पोलिसांची कामगिरी

बार्शी – शहरातील आंबेडकर कॉम्प्लेक्ससमोरुन एक मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत बार्शी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार बार्शी शहर पोलीस स्टेशन मधील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन सदर गुन्हयातील संशयीत आरोपीना अटक केली आहे.

आकाश महादेव नायकोजी वय १९ वर्षे रा. गवत गल्ली हल्ली बोबल्या मारुती बायपास रोड बार्शी व
महालिंग बाबुराव परळकर वय ५० वर्षे रा. संभाजी चौक, दाबाडे गल्ली गेवराई जि.बिड यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली मोटारसायकल व बार्शी पोलीस ठाणे कडील
१) गु.र.नं. १४४/२०२०
२) गु.र.नं.१३७/२०२०
३ ) गु .र.नं. ९२१ / २०१९
४) गुर.नं.४२८/२०१८
५) गु.र.नं.२४४/२०१८

या गुन्हयातील चोरीस गेलेल्या ७ मोटारसायकलसह अशा एकुण २,२०,०००/- रू किंमतीच्या ०८ मोटार सायकल जप्त करून सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची उत्कृष्ट कामगीरी पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील साो. वअप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोउपनि प्रेमकुमाट केदार, सपोफौ/अजित वरपे, पोहेकॉ. सहदेव देवकर,पोना/अमोल माने, संताजी आलाट, सचिन आटपाडकर, लक्ष्मण भांगे यांच्या पथकाने केली आहे. या कामगिरीनंतर डी.बी पथकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: