चुकून बसपा ऐवजी मतदान गेलं भाजपाला,त्याने चक्क बोटच कापले

लखनौ : बुलंदशहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकारपूर परिसरातील एका दलित मतदारानं गुरुवारी (18 एप्रिल)लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान बीएसपी ऐवजी भाजपला मत दिलं, म्हणून त्यानं चक्क स्वतःचंच बोट कापून घेतलं. ‘हिंदुस्‍तान टाइम्‍स’नं दिलेल्या वृत्तानुसार, या मतदाराला बसपच्या उमेदवाराला मतदान करायचं होतं. पण त्यानं चुकून भाजपच्या चिन्हासमोरील बटण दाबलं. यानंतर त्याला पश्चाताप होऊ लागला, म्हणून त्यानं थेट स्वतःचं बोटच कापलं.

पवन कुमार (25 वर्ष) असं मतदाराचं नाव आहे. बुलंदशहरातील शिकारपूर येथील अब्दुल्लापुर हुलासन गावातील तो रहिवासी आहे. पवन कुमारला सपा-बसपा-रालोद आघाडीचे उमेदवार योगेश वर्मा यांना मत द्यायचं होतं. पण चुकून त्यानं भाजप उमेदवार भोला सिंह यांना मतदान केलं. पवनला स्वतःच्याच चुकीचा इतका पश्चाताप होऊ लागला की त्यानं बोट कापून स्वतःला शिक्षा दिली.

admin: