चक्क काँग्रेस नगरसेवकाने रेशन कार्डवर ठोकले सही आणि शिक्के…..!

शिधा वितरणाबरोबर सरकारी योजनांचा लाभ घेण्यसाठी रेशनकार्ड महत्वपूर्ण सरकारी दस्तावेज मानले जातात. पुरवठा अधिकारी यांच्या साहीनेच हे रेशन कार्ड दिले जातात. मात्र सर्व नियम धाब्यावर बसून चक्क एका नगरसेवकाने आपल्या नगरसेवक पदाचे सही आणि शिक्के वापरून रेशन कार्डचे वितरण आपल्या प्रभागात केले आहे.

संगमनेरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक किशोर बद्रीनाथ टोकरी यांच्या सही शिक्क्यानिशी वाटप केलेली काही रेशनकार्ड आढळून आली आहेत. याविषयी माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली आहे.

काँग्रेस नगरसेवकांने अशा पद्धतीने रेशनकार्डवर सही शिक्के मारून देण्याचा अधिकार नाही, त्यामुळे हा प्रकार कसा घडला, याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन तहसिलदारांनी दिले आहे. मात्र सत्तेत बसलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदावर बसलेल्या नगरसेवकानेच सरकारी नयं धाब्यावर बसवणे निंदनीय आहे अशी टीका आता होताना दिसत आहे.

admin: