ग्लोबल न्यूज : चंद्रकांतदादा पाटील यांना भारतीय जनता पक्षाचा इतिहास माहिती नाही ते अगोदर विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. ते आता भारतीय जनता पक्षात आले असल्याने ते नवीन आहेत. मी कॉंग्रेसमधून आलोय असे ते म्हणत असतील तर यांनी अगोदर पक्षाच्या इतिहासाची माहिती करून घ्यावी, असा टोला भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे.
मुक्ताईनगरातील निवासस्थानी ‘सकाळ माध्यम समूहाशी बोलतांना ते म्हणाले, कि होय, आम्हाला पक्षाने भरपूर दिले आहे. मात्र आम्हीही पक्षासाठी भरपूर खस्ता खालेल्या आहेत. आम्ही गोपीचंद पडळकर यांच्यासारखे ऐतखावू नाहीत. भारतीय जनता पक्ष शुन्य असतांना आम्ही पक्ष वाढविण्यासाठी परिश्रम घेतले आहे. परंतु पक्षाने आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही पक्षाचे आजही आणि कायम आभारी आहोत.
होय,मी मार्गदर्शकच आहे
चंद्रकांतदादा पाटील यांनी खडसे यांनी मार्गदर्शक व्हावे याला उत्तर देतांना खडसे म्हणाले, मी सुरूवातीपासून पक्षात मार्गदर्शक म्हणूनच काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक माझ्याच मार्गदर्शखाली काम करीत होते. मार्गदर्शन करूनच राज्यात पक्षाला वाढविण्याचे काम मी केले आहे करीत आहोत.
आम्ही जे काही मिळवलं, ते स्वत:च्या हिमतीवर मिळवलं. ज्यावेळी कुणीही पक्षात यायला तयार नव्हतं, उमेदवारी घेत नव्हतं, त्या काळात मी निवडून येत होतो. मी आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही. आता पक्षात सक्रीय झालेल्यांना पाटील यांना हा इतिहास माहीत नाही, अशा शब्दांत खडसेंनी पाटील यांचा समाचार घेतला.
तुम्ही माझ्यावर घराणेशाहीची टीका करता. माझ्या घरात केवळ मला आणि सुनेलाच तिकीट देण्यात आलं, असं म्हणत खडसेंनी भाजपामधल्या घराणेशाहीची यादीच वाचली. ‘देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. देवेंद्र मुख्यमंत्री होते. त्याआधी आमदार राहिले. त्यांच्या काकू मंत्री होत्या. २६ वर्ष आमदार होत्या. ही घराणेशाही नाही का?’ असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.
‘रावसाहेब दानवे मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पाटलांच्या घरात आमदारकी खासदारकी आहे. याला घराणेशाही म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं’, असा सवालदेखील खडसेंनी विचारला.
चंद्रकांतदादांनी भाजपचा इतिहास पहावा
चंद्रकांतदादा पाटील यांनी खडसे हे कॉंग्रेसमधून आले असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देतांना खडसे म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विद्यार्थी परिषदेचे काम केले आहे. ते आता भारतीय जनता पक्षात आले आहेत. ते नवीन असल्यामुळे त्यांना पक्षाच्या इतिहासाची माहिती नाही. त्यांनी ती करून घ्यावी. हा नाथाभाऊ कधीही कॉंग्रेसमध्ये नव्हता, 1980 मध्ये पक्ष स्थापन झाला त्यावेळी पक्षातच होते.
1982 मध्ये विश्व हिंदु परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित होते. 1983 तळजाई येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीरास आपण उपस्थित होतो. सन 1982 ते 1992 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समितीचा सदस्य होतो. या शिवाय पक्षाच्या अनेक आंदोलनात आपण भाग घेतला आहे. पक्षाच्या जडणघडणीत आपले योगदान आहे,