ग्रामपंचायत सदस्य ते संसद खासदार जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस कामे करत असतांना सामान्यांची परिस्थिती का सुधारत नाही:रामदास फुटाणे

एच सुदर्शन

आरक्षणाने सगळे प्रश्न मिटणार नाहीत – रामदास फुटाणे

बार्शीत युगदर्शक आयकॉन पुरस्काराचे वितरण

  बार्शी : येथील युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या  युगदर्शक आयकॉन पुरस्काराचे माजी आमदार व कवि रामदास फुटाणे, आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. रविवारी रात्री दि.४ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण सांस्क्रतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे याचे स्वरूप होते.

    यावेळी  महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळाचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, तुकाराम शिंदे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्षनेेते नागेश अक्कलकोटे, युगदर्शक परिवाराचे प्रमुख नितीन भोसले, चित्रकार सचिन खरात, माधवबागचे डॉ.पवन कोळी, सुभाष सिध्दीवाल, संतोष सूर्यवंशी, अरूण कापसे, उपस्थित होते.

    रामदास फुटाणे म्हणाले, कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही, सगळे पक्ष एकसारखेच असतात हे सामान्यांनी लक्षात घेतले पाहिजे. सगळीकडे स्वप्न विकणारांची गर्दि आहे. पंतप्रधानांपासून ते ग्रामपंचायतच्या सदस्यांपर्यंत प्रत्येक जण आपल्या जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस कामे करत असतांना सामान्यांची परिस्थिती का सुधारत नाही, पुन्हा त्याच प्रश्नांची आश्वासने देण्याची वेळ येते ही शोकांतीका आहे. आरक्षण मिळाले म्हणजे आपले सगळे प्रश्न मिटतील असे कोणी समजण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आरक्षण दिले तरी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार नाही. शिक्षणाच्या नावाखाली लाजून आपले पाेट भरणार नाही. राजस्थान, गुजराथहून आलेल्या व्यक्ती आपल्या इथे येवून मोठी कमाई करत आहेत परंतु इथला तरूण त्यांच्याकडून काही शिकायला तयार नाही. युगदर्शक संस्थेने मागील सहा वर्षांपासून माणसे जोडण्याची कामे केली त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. 

    उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी राजकिय वक्तव्य करतांना आमदार सोपल यांना उद्देशून साहेबांना जय महाराष्ट्र म्हटल्याबरोबर प्रेक्षकांतून हशा आणि टाळ्यांचा आवाज घुमला.

आमदार सोपल यांनी अध्यक्षीय समारोपात पुरस्कार मिळालेल्यांना मागोवा घेत बारबोले यांना राजकारणात इतके स्पष्टपणे बोलू नये असा सल्ला देत, शेवटी मोठ्या आवाजात जय महाराष्ट्र म्हटले.

 राजेंद्र मिरगणे म्हणाले, मला राजकारणाची दिशा कळत नाही. मला राजकारण  कळत नाही तर समाजकारणाची आवड आहे.राजकारण व समाजकर्णाचा धंदा केला नाही. राजकीय गुण नाही. कामासाठी कुणाला कधी मागे फिरवले नाही. मी कामाचं कधी श्रेय घेतल नाही. मी राजकारणाला लायक नाही असे नेते व जनतेला वाटते अशी उपरोधिक टीका करत निवारा अद्याप पूर्ण नाही.सर्वाना घर ही संकल्पना महामंडळा च्या माध्यमातून पूर्ण करू अशी ग्वाही दिली.

    कार्यक्रमाच्या सुरूवातीस दिपप्रज्वलन आणि आण्णाभाउ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नरेश ठाकूर यांनी सूत्र संचलन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बारबोले, सचिन गायकवाड, अमोल शिरोडकर, बापूसाहेब मोरे, गुरू साखरे, श्रीकृष्ण उपळकर, विशाल नवले, उदय पोतदार, गिरीष कुलकर्णी, विशाल भोसले आदींनी परिश्रम घेतले.

———-

युगदर्शक आयकॉन पुरस्काराने यांचा झाला सन्मान

राजेंद्र मिरगणे (महाराष्ट्र), शुभांगी भोसले (जिल्हा), विजय कबाडे (पोलिस), तुकाराम शिंदे (संस्था), अरूण बारबोले (शैक्षणिक), सतिश अंधारे (उद्योजक), सुषमा जाधवर (सरपंच), मिलींद कांबळे (बँकिंग), विजयसिंह नाईकनवरे (कृषि), अतुल पाडे (युवा), गणेश गोडसे (पत्रकारिता), डॉ अमोल जाधव(वैद्यकीय)

ग्लोबल न्युज नेटवर्क: