‘गोड बातम्यां’चे कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? – शिवसेना

मुंबई | सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दिवसेंदिवस हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान सुधीर मुनगंटीवारांनी लवकरच गोड बातमी येणार असे वक्तव्य केले होते. यावर आता सामनामधून टीका करण्यात आली आहे.

‘भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार ‘गोड बातमी’चे दाखले देत आहेत. आता ही ‘गोड बातमी’ म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे ‘लग्न’ वगैरे ठरले आहे? अर्थात ‘गोड बातम्यां’चे कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? तो कसा हलेल? हे प्रश्न आहेतच.’ अशा शब्दात सामनामधून भाजपवर टीकास्त्र साधण्यात आले आहे.

अग्रलेखात नेमके काय ?

  • महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे, ‘‘शिवसेनेचा’’ मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार व तसे भाग्य मऱ्हाटी जनतेच्या ललाटी लिहिले असेल तर ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणात नाही. कारण ही भाग्यरेषा भगवी आहे.
  • भारतीय जनता पक्ष ज्या ‘महायुती’चा विचार करीत आहे ती आकाराने मोठी असली तरी त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आलेला नाही. हे सर्व बिन आमदारांचे ‘महामंडळ’ही परवा राज्यपालांना भेटले व त्यांनी सरकार स्थापनेबाबत चिंता व्यक्त केली. ही चिंता राज्याची नसून पुढील सरकारात आपले स्थान काय, यावर जास्त आहे.
  • चा भारतीय जनता पक्षाशी, हिंदुत्व वगैरे विचारधारेशी काडीचा संबंध नाही असे काही ‘बाटगे’ नव्या आमदारांशी संपर्क करून ‘थैली’ची भाषा करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हे सर्व मुख्यमंत्री किंवा भाजप नेत्यांच्या आशीर्वादानेच घडत आहे, असा आमचा दावा नाही. पण हे तथाकथित वाल्मीकी जणू राज्य स्थापनेची जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या थाटात पुढच्या सरकारचे हवाले देत बाटवाबाटवी करीत आहेत.
  • ‘भारतीय जनता पक्ष चर्चेचा दरवाजा बंद करून बसलेला नाही’ हे वाक्य सध्या फेकले जात आहे. आम्हीही दरवाजे, खिडक्या उघडय़ाच ठेवल्या आहेत व हवा खेळती ठेवली आहे इतकेच. फक्त हवेबरोबर कीटक आत येऊ नयेत याची पक्की तजवीज करून ठेवली आहे. घर आमचेही आहे व ते पक्के सागवानी, शिसवी लाकडाचे तसेच छत, भिंती मजबूत असलेले आहे. पैपाहुण्यांच्या चपलांचा ढिगारा आजही आमच्या दाराबाहेर आहे. हीच शिवसेनेची श्रीमंती म्हणायला हवी.
ग्लोबल न्युज नेटवर्क: