गॅलरी   विधानसभा निकालाआधी मुख्यमंत्री फडणवीस केदारनाथ चरणी नतमस्तक

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत. फडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.

विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास उरल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असे भाकीत वर्तविले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींदेखील केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाआधी मोदी केदारनाथला गेले होते. 19 मे रोजी निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार होतं.

त्याआधी म्हणजेच 18 मे रोजी मोदी केदारनाथला गेले. त्यांनी जवळपास 15 तास एका गुहेत ध्यानधारणा केली. यानंतर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपाला 303 जागा मिळाल्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: