गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलीसांच्या सन्मानासाठी केलेल्या ‘त्या’ आवाहनास मोठा प्रतिसाद

गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलीसांच्या सन्मानासाठी केलेल्या ‘त्या’ आवाहनास मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ,महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद

मुंबई – राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कोरोना विरुद्ध योद्धा बनून सर्व जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे.

अशा परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य, मनोबल उंचाविण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ राज्यातील सर्वांनी आपआपल्या समाज माध्यमावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा.या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आवाहनास राज्यातील जनतेनी, मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

कुर्ला,विनोबा भावे नगर पोलिस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर यांचे कोरोनाने निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात आणखी सहा पोलीस बांधवांचे कोरोना मुळे निधन झालेले आहे .

यासोबतच जवळपास ८८७ अधिकारी, पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्याचा हा अतिशय कठीण काळ असून, आपल्या कार्यक्षमतेच्या दुप्पट क्षमतेने पोलीस सर्वत्र कार्य करत आहेत.

अशावेळी त्यांचे मनोबल वाढावे, आपण एकटेच आहोत असे त्यांना वाटू नये, सर्व समाज त्यांच्या सोबत आहे. हे त्यांना दाखवून देण्यासाठी मी माझ्या समाज माध्यमांवर पोलिसांचा लोगो डी.पी. म्हणून ठेवणार आहे,असा लोगो आपण सर्वांनी ठेवून पोलिसांच्या कार्याची दखल घ्यावी.

आपले पोलीस दल हे कोणतेही संकट येवो, जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी उभे असते.अगदी २६ -११ च्या अतिरेकी हल्ल्यात सुद्धा आपल्या जिवाची बाजी लावून महाराष्ट्र पोलीस दलाने राज्यातील जनतेचे संरक्षण केलेले आहे.

अशाच प्रकारचे युद्ध आता या कोरोनाविरुद्ध आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी. असे आवाहन केल्यानंतर लगेचच राज्यातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थी व सामान्य नागरीक यांनी आपल्या सोशल मिडियाचा डी.पी. वर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला.त्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत

आपल्या समाज माध्यमांवर डी.पी. म्हणून पोलीस दलाचा लोगो ज्यांनी ठेवला,त्यात प्रामुख्याने शाहरुख खान,सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा,सलमान खान,रणविर सिंग,अक्षय कुमार,माधुरी दीक्षित,अजय देवगण,वरूण धवन,सुनील शेट्टी,करण जोहर, कतरिना कैफ,दिया मिर्झा साजिद नडियादवाला,गझल सम्राट तलत अजिज व पिनाज मसानी,फॅशन डिझायनर नीता लुल्ला,कोरिओग्राफर लुबना आदमास यांचा सह अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे.

admin: