खूशखबर! जिओच्या ग्राहकांना 10 रूपयांच्या टॉप-अपवर 1 जीबी डेटा ‘फ्री’!

जिओच्या ग्राहकांना १० रुपयांच्या टॉप-अपवर १ जीबी डेटा ‘फ्री’

इतर नेटवर्कवर कॉलिंग केल्यानंतर १० रुपये खर्च केल्यावर १ जीबी डेटा फ्री

१० रुपयांपासून तर १००० रुपयांपर्यंतचे जिओचे टॉप-अप वाऊचर उपलब्ध

मुंबई: गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये जिओनं इतर नेटवर्कवर कॉल केला तर ६ पैसे प्रति मिनीट चार्ज लावलेला आहे. यानंतर आता इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना टॉप-अप रिचार्जची गरज पडते. अशा ग्राहकांना जिओ प्रत्येक १० रुपयांच्या खर्चावर १ जीबी डेटा फ्री देणार आहे. Reliance Jio कमी पैशांमध्ये अधिक डेटा देण्यासाठी ओळखली जाते. अनेकदा जिओनं आपल्या यूजर्संना विविध ऑफर्सद्वारे फ्री डेटा दिलेला आहे. गेल्यावर्षीच्या अखेरच्या महिन्यामध्ये जिओनं इतर नेटवर्कवर कॉल केला तर त्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट असा चार्ज लावलाय. यानंतर आता ग्राहकांनी जर १० रुपयांचा टॉप-अप रिचार्ज खर्च केला तर त्यांना १ जीबी डेटा फ्री जिओ देणार आहे.

रिलायन्स जिओच्या अनलिमिटेड प्लान्समध्ये ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ठराविक आययूसी मिनीट दिले जातात. हे आययूसी मिनिट विविध प्रीपेड पॅकच्या किंमतींवर आधारित वेगवेगळे आहेत. मात्र आययूसी मिनीटं संपल्यानंतर आपल्याला टॉप-अप रिचार्ज करावा लागेल, यात मिळणाऱ्या बॅलेंसद्वारे आपण इतर नेटवर्कवर कॉल करू शकता.

जिओचा सर्वात स्वस्त टॉप-अप पॅक १० रुपयांचा आहे. १० रुपयांच्या रिचार्जमुळे आपण इतर नेटवर्कवर १२४ मिनीटांपर्यंत कॉल करू शकता. जिओ अशा ग्राहकांना प्रत्येक १० रुपयांच्या टॉप-अपच्या खर्चावर १ जीबी कॉम्प्लिमेंट्री डेटा देत आहे. याचा अर्थ आपण इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जितक्यांदा १० रुपयांचं टॉप-अप वॅल्यू खर्च कराल, आपल्याला तितक्यांदा १ जीबी फ्री डेटा मिळेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: