पाकव्याप्त काश्मीर संदर्भात लष्कर प्रमुखांचे महत्वपूर्ण वक्तव्य; वाचा काय म्हणाले

नवी दिल्ली ।  भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पीओके संदर्भात एक महत्वपू्र्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, जर संसदची इच्छा असेल तर पीओके (पाकिस्तान व्याप्त काश्मीर) वरही भारत कारवाई करेल. लष्कर प्रमुख म्हणाले, ‘संपूर्ण काश्मीर हा भारताचा एक भाग आहे असा संसदीय ठराव आहे. जर संसदेने असे सांगितले की ते क्षेत्र (पीओके) देखील आपलेच असावे आणि आम्हाला त्यासंदर्भात आदेश दिले, तर आम्ही त्यासाठी योग्य कारवाई करू.

शनिवारी नवीन लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे म्हणाले की, सियाचीन आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत आत्मविश्वासपूर्ण संदेश देताना ते म्हणाले की, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.

ते म्हणाले की, सीडीएसची निर्मिती हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सीडीएसची स्थापना सैन्याला बळकटी देईल. तीन सैन्यात समन्वय असणे आवश्यक आहे. आम्ही भविष्यातील आव्हाने व धमक्या लक्षात घेऊन नियोजन करू आणि अर्थसंकल्पाचा प्राधान्याने उपयोग केला जाईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: