खुशखबर! पोलीस कर्मचाऱ्यांना वाढदिवशी मिळणार सुट्टी

सातारा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱयांना तणापासून मुक्त करण्यासाठी त्यांना अयुष्यातील महत्वच्या अशा दिवसाची म्हणजेच त्यांच्या वाढदिनी सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याने त्याच्या आनंदात भर पडणार आहे. हा अभिनव उपक्रम सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा पोलीस दलात नववर्षानिमित्त सुरु केला आहे.

पोलीस दलामध्ये काम करीत असताना सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचे दैनंदिन जीवन कायमच व्यस्त असते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठीण प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक प्रकारच्या सण-उत्सवामध्येही पोलीस अ]िधकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवता येत नाही. कुटुंबातील अनेक छोटया-मोठया आनंदाच्या प्रसंगी ते कामात व्यस्त असतात. अशा धकाधकीच्या जीवनामुळे त्यांच्यावर सतत तणावाचे ओझे होत आहे. त्यामुळे त्यांना नैराश्यास सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम त्यांचे कर्तव्यावर तसेच त्याचे कुटुंबीयांवरही होत आहे.

प्रत्येक मनसाच्या आयुष्यात त्याचा वाढदिवस हा महत्वाचा क्षण असतो. तसेच प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचारी यास किमान स्वतःचा वाढदिवस कुटुंबासह साजरा करता यावा. स्वतःचा वाढदिवस त्यांना आनंदात व तणावमुक्त वातावरणात पार पाडता यावा, याकरीता सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे वाढदिवसाचे दिवशी रजा देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतला आहे.

तरी या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने संबंधीत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचे वाढदिवसाचे शुभेच्छापत्र दिले जाणार असुन प्रत्येक महिन्यात वाढदिवस असणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांची शुभेच्छापत्रे संबंधीत प्रभारी अधिकारी यांचेकडे दिली जाणार आहेत. तरी प्रभारी अधिकारी यांनी संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांना सदरचे शुभेच्छापत्र वेळेत देवुन त्यांना शुभेच्छा द्याव्यात. तसेच सदर कर्मचारी यांना त्यांचा वाढदिवस साजरा करणेकरीता सदर दिवशी त्यांचे मागणीप्रमाणे साप्ताहिक सुट्टी/किरकोळ रजा देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे

. इतर कोणत्याही अत्यावश्यक कारणास्तव सुट्टी देता आली नाही तर त्याबाबत संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांना अवगत करावे व सदर कारण संपताच प्राधान्याने त्यांना सा.सु./किरकोळ रजा देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

तरी हा उपक्रम यशस्वीपणे सुरु ठेवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभारी अधिकारी यांनी याकडे व्यक्तीशः लक्ष पुरवावे व या उपक्रमाची अंमलबजावणी 100 टक्के होईल याची दक्षता घ्यावी, अशाही सुचना पोलीस आधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: