जेव्हा एका हिंदू जोडप्याने मशिदीत लग्न केले. हे का घडलं? वाचा सविस्तर-

हे सुंदर चित्र केरळमधून आले आहे.
जेव्हा एका हिंदू जोडप्याने मशिदीत लग्न केले. हे का घडलं? मुलीच्या आईला लग्नासाठी पैसे जमवता आले नाही. मुलीच्या आईने आपल्या मुस्लिम शेजाऱ्याला मदत मागितली जो आधीपासून त्या मुलांचा शैक्षणिक खर्च सांभाळत होता.

त्याने हा विषय आलापूझाच्या कायकुलम भागातल्या चेरुवली मुस्लिम जमातच्या मशिदी समितीकडे पोहोचला तेव्हा समितीच्या सदस्यांनी त्या महिलेस मदत करण्याचा निर्णय घेतला. आणि मग मशिदीच्याच प्रांगणातच लग्न हिंदू प्रथेनुसार झाले. ग्रामस्थांची मिरवणूक आणि केटरिंगचे व्यवस्थापन मशिद समितीने केले. हाच आहे मागच्या 70 वर्षांत हिंदूमुस्लिम समाजाने दाखविलेला सामंजस्यपणा.

द्वेष कितीही वाढलं तरी ते प्रेमावर कधीही अधिराज्य गाजवू शकत नाही ! अशा प्रेरणादायक घटना भारताच्या वं आपल्या महाराष्ट्राच्या काना कोपर्यात दररोज घडत असतात. तथापि, काही धर्मांधळे लोक ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, कारण जर असा कौमी एकतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचला तर त्यांचे धर्मद्वेषाच्या आधारवर चाललेले दुकान लगेच बंद होईल.

तर मग आपण सर्व जण अशा प्रकारच्या लहान लहान घटना शेयर करूया ज्यामुळे आपला प्रेमाचा वारसा नक्कीच वाढत जाईल.

जय भारत…

ग्लोबल न्युज नेटवर्क: