टीम ग्लोबल न्युज : अहमदनगर लोकसभेचे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहमदनगर येथे झालेल्या भाषण करीत असलेल्या गांधी यांना भजपाच्याच नगर जिल्हाध्यक्ष यांनी भाषण मध्येच थांबवण्याच्या सूचना दिल्याने खासदार गांधी यांचे डोळे डबडबले.
उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे, यावेळी खासदार दिलीप गांधी भाषण करत असताना, त्यांना मध्येच थांबण्याची सूचना जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केली त्यामुळे भावनिक झालेल्या गांधींचे डोळे पाणावल्याचे चित्र पहायला मिळाले.मात्र चिठ्ठी दिल्यामुळे त्यांचा पारा चढला व ते भडकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर येण्यापूर्वी खा दिलीप गांधी भाषण करत होते, त्यांचे भाषण सुरु असतानाच जिल्हाध्यक्ष बेरड यांनी चिट्ठी देत भाषण थांबवण्यास सांगितले, भाषण थांबवण्यास सांगितल्यावर गांधी भडकले, भाषणात विखेंच नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन. तसेच विद्यमान खासदार असताना देखील बोलून न दिल्याने ते भावनिक झाले होते.परंतु उमेदवार सुजय विखे यांनी मात्र सर तुम्ही बोला असे गांधी यांना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिलीप गांधी यांनी नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास केल्याच सांगितल आहे.त्यामुळे गांधी यांना काहीसे समाधान वाटले असेल.