उस्मानाबाद । उस्मानाबाद शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर नायगाव (पडोळी) येथे झालेल्या हल्ल्यात हल्लेखोर अजिंक्य टेकाळे याला शिराढोन पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तो भाजप आयटी सेलचा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी अजिंक्यने फेसबुक वर जर भाजप वाढवायचा असेल तर जिल्ह्यातील शिवसेना संपली पाहिजे त्यामुळे यंदा राष्ट्रवादी या आशयाची पोस्ट केली होती. या हल्लेखोरावर कलम 307 नुसार शिराढोन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.