कोरोनाच्या संकटात ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू

कोरोनाच्या संकटात पावसाळा विधिमंडळाच्या अधिवेशनाची तयारी

सुरज गायकवाड

ग्लोबल न्यूज: सध्या देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट उभे राहिलेले असताना ठाकरे सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. या बाबतचे वृत्त झी 24 तासने दाखविले आहे. २२ जून रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे.

या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशन कोणत्या स्वरूपात असणार आहे तसेच या बाबतची आखणी करण्यासाठी कामकाज समितीची बैठक होणार आहे.

या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा होऊन ते निश्चित केले जाईल. असं असले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता आहे. तरीही नियमांनुसार आणि सर्व शक्यता गृहित धरून विधिमंडळाला आणि सरकारला अधिवेशनाची तयारी करावी लागणार आहे.

त्यासाठीच सोमवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसंच सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित असतील.

तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळानेही अधिवेशनाची तयारी म्हणून आमदारांकडून ऑनलाईन सारंकित प्रश्न मागवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी विधानपरिषदेसाठी साडे सहाशे प्रश्न दाखल झाले आहेत.

येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होईल. याशिवाय अर्धा तासाच्या चर्चा, लक्षवेधी सूचना विधीमंडळाकडे आमदारांकडून पाठवण्यात येतील. हे सर्व विधीमंडळाकडून मंत्रालयात संबंधित विभागात पाठवण्यात येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: