कोरोनवर मात करून जितेंद्र आव्हाड आले घरी ;शरद पवारांसह मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपचाराच्या मदतीनं करोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, ते घरीही पोहोचले आहेत.

आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. “गेल्या काही दिवसांपासून करोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईला यश आलेलं असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहु द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, करोनाचं निदान झाल्यानंतर आव्हाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर जिद्द व उपचाराच्या मदतीनं आव्हाड यांनी करोनावर मात केली आहे.

आव्हाड यांनी तीन ट्विट करता आपल्या भावनांना वाट करून दिली आहे

माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.

या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड मा.शरद पवार साहेब ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मा.उद्धवजी ठाकरे ,मा.सुप्रियाताई सुळे ,मा.अनिल देशमुख ,मा.जयंत पाटील ,मा.राजेश टोपे ,मा.मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.

माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.

अपने कदमों के काबिलियत पर
विश्वास करता हूं ,
कितनी बार तूटा लेकीन
अपनो के लिये जीता हूं ,

चलता रहूंगा पथपर
चलने मैं माहीर बन जाऊंगा
या तो मंजिल मिल जायेगी
या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: