केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती केली आहे.
कोश्यारी यांच्यासह देशातील आणखी काही महत्वाच्या राज्यातील राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान, बंडारु दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेशच्या तर तेलंगणाच्या राज्यपालपदी तमिलसाई सुंदरराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्र यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.