किरण मानेंनी मंजुळेंची कविता शेअर करत लिहिली ‘लब्यु भावा’ पोस्ट

 

सातारा | नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शनानंतर सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सर्व स्तरावर फक्त आणि फक्त झुंडची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे कथानक, वास्तववादी अभिनय, कथानकातील लयबद्धता या साऱ्याने प्रेक्षक आणि समीक्षक भारावून गेले आहेत.

हिंदीतील दिग्गज कलाकारांपासून अगदी निर्माते आणि दिग्दर्शक यांनीही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून मराठी सिनेसृष्टीतूनही चित्रपटावर कौतुकाचा पाऊस पडतोय. दरम्यान सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी झुंडचे कथानक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले आहे. यानंतर आता किरण माने यांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागराज मंजुळेंसाठी लब्यु भावा पोस्ट लिहिली आहे.

सोशल मीडियावर आपले मत परखड आणि स्पष्ट मांडण्यासाठी किरण माने यांना ओळखलं जात. दरम्यान झुंड चित्रपटाविषयी व्यक्त होत नागराज मंजुळे यांचे कौतुक करताना किरण माने यांनी हात राखता घेतलेला नाही. तर भरभरून लिहिलं आहे. या पोस्टमध्ये किरण माने लिहितात कि, नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालोवतो.

आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून- तोडून तू खूप काही बदलतोयस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस.सहजपणे. ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा अशी पोस्ट लिहिली आहे

Team Global News Marathi: