खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
🛎 श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी संध्याकाळी चांद्रयान-2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा चौथा टप्पा होता. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे.
🛎 जम्मू : अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्नायपर रायफल सापडल्याने जम्मू काश्मीर सरकारकडून अमरनाथ यात्रा हवामान बिघडल्याने आणि दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
🛎 जम्मू : काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून २८० सैन्याच्या कंपन्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने भारतीय लष्कर आणि हवाई दलाला हाय अलर्टलवर ठेवलं आहे.
🛎नवी दिल्ली : राम मंदिर प्रकरणावर नेमलेल्या मध्यस्थ समितीला तोडगा काढण्यात अपयश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निकाल लागेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार आहे.
🛎नवी दिल्ली : तिहेरी तलाकच्या कायद्यातील गुन्हेगारी शिक्षेच्या तरतुदीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आली आहे. समस्त केरळ जमैतुल उलेमा संघटनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आले असून संविधानाच्या कलम 14, 15, आणि 21 उल्लंघन झाल्याचा याचिकेत दावा करण्यात आले आहे.
🛎 जयपूर : मॉब लिंचिंग आणि ऑनर किलिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी राजस्थान सरकार लवकरच कायदे करणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले आहे.
🛎मध्यप्रदेश : उन्नाव बलात्कार पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात येऊन स्थायिक होण्याचं आमंत्रण दिली आहे. आपण पीडित मुलीचं राज्याच्या मुलीप्रमाणे काळजी घेऊ असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे.
🛎 मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणात कपात करण्यात आली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
🛎मुंबई : ज्यांनी कधी स्वत: निवडणूक लढवली नाही, त्यांनी ईव्हीएमवर बोलू नये, जे पहिले कधी घराबाहेर पडत नव्हते ते आता लोकांच्या फ्लॅटमध्ये जाऊन भेटत आहे, भाजपचे शिक्षण मंत्री आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला.
🛎मुंबई : मिशन मंगल हा हिंदी चित्रपट मराठीमध्येही डब करुन प्रदर्शित होत आहे, मिशन मंगल’ मराठीत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झालाच तर मग आम्हालाही मिशन खळ्ळ खटॅक हाती घ्यावं लागेल असा इशारा मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे.
🛎मुंबई : येवला – लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांची घरवापसी झाली आहे. कल्याणराव पाटील यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.
🛎 मुंबई : यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्त्वाचे सण आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे.
🛎 बीड : बीडचे लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं आहे.
🛎सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीचे ताराख जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठ अधिविभागाचे मतदान 7 सप्टेंबर 2019, तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे मतदान 24 सप्टेंबरला होणार आहेत.
🛎सोलापूर : सांगली – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या कामास दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने मागे घेऊन प्रकल्पाचे कामकाज पुर्ववत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी ही माहिती दिली.
🛎सोलापूर : पंतप्रधान पिकविमा योजनेचा माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 5लाख 24 हजार 756शेतकऱ्यांनी विविध पिकांचं विमा संरक्षण घेतली आहे, तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा भरण्यास होणाऱ्या विलंब लक्षात घेऊन शासनाने 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली होती.
🛎सोलापूर : वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेले पाणी संगम येथून भीमा नदीद्वारे वेगाने पुढे सरकत असून गुरुवारी पाण्याने पंढरपूर नंतर पुळूज ओलांडले आहे. आज 3 ऑगस्ट रोजी पाणी औज बंधार्यात पोहोचणार आहे. यंदा सोलापूरसाठी वीर धरणातून आलेल्या पाण्याने औज बंधारा भरला जाणार आहे.
🛎 मंद्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हे मोठी लोकवस्ती असलेले गाव अनेक वर्षांपासून सुविधा व विकासाअभावी उपेक्षित होते. मात्र प्रस्तावित एमआयडीसी, तहसील उप-कार्यालय, राष्ट्रीय व राज्य महामार्गामुळे या गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
🛎करमाळा : येथील महाराष्ट्र बँकेतील छत पडून दुर्घटनेतील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. जखमी असलेल्या रुग्णांशी चर्चा करून होत असलेल्या उपचारांबद्दल माहिती घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.
🛎 माढा : आम्हाला आरक्षण नको पण अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण समाज सेवा संघाने आयोजित केलेल्या ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात करण्यात आली आहे.