काय माजी खासदार, माजी खासदार लावलंय…! चंद्रकांत खैरेंचा संयोजकांना सुनावलं

औरंगाबाद । लोकसभा निवडणूकीत एमआयएम कडून स्विकारावा लागलेला पराभव शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवाची सल खैरेंच्या मनात अजूनही कायम आहे. हे दोघे एकत्र आले की एकमेकांना चिमटे काढायला विसरत नाहीत असाच अनुभव आज औरंगाबाद येथे2 आला.

याचा प्रत्यय बांधकाम व्यावसायिकांची संघटना अर्थात क्रेडाईच्या (CREDAI) कार्यक्रमात आला. त्यांना सतत माजी खासदार संबोधण्यात आल्याने त्यांनी चांगलंच सुनावलं, त्यात कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.

कार्यक्रमातील वक्त्यांकडून माजी खासदार असा उल्लेख करण्यात येत होता. यावर खैरे म्हणाले, “मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जातोय. काय माजी खासदार, माजी खासदार लावलंय… मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात.”यावेळी बाजूलाच असलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. “मी खासदार झालोय, याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: