काय असेल कारण की, अजितदादा पवार म्हणाले मी ही निवडणूक लढवणार नाही

मुंबई | “पवार घराणे आणि निवडणूक” हे सूत्र ठरलेलं आहे. एखादा किरकोळ अपवाद वगळता पवारांच्या नशिबी निवडणुकीतील पराभव आलाच नाही. पण आता धाकटे पवार म्हणजेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण भारतीय कबड्डी महासंघाची अध्यक्ष पदाची निवडणूक लढणार नाही असे जाहीर केलं आहे.

तर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपण भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्याचं कारण देताना पवार म्हणाले की, मी जे काम हाती घेतो ते जबाबदारीने पार पाडतो. राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मी भारतीय कबड्डी महासंघाला वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे ते पद घेणं मला उचित वाटत नाही, म्हणून आता मी ही निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी सांगितले.

भारतीय कबड्डी महासंघाच्या मुख्य निवडणुकीसाठी 17 ऑगस्टपर्यंत संबंधित संघटनांनी प्रत्येकी 2 नावं पाठवायची आहेत. राज्य कबड्डी संघटनेने आस्वाद पाटील यांचं नाव निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या नावाबाबत अजून चर्चा सुरू आहे.

दरम्यान आता अजित पवारांनी नकार दिल्यावर या जागी कोणाची वर्णी लागते याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.


ग्लोबल न्युज नेटवर्क: