काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात ,हे पाच नेते झाले कार्याध्यक्ष

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोरात यांच्यासह पाच कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे केंद्रीय काँग्रेस समितीने जाहीर केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जवाबदारी थोरात यांच्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर शनिवारी रात्री केंद्रीय काँग्रेस कमिटीने पत्रक काढून महाराष्ट्र काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 


त्याशिवाय, जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार समितीचे अध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे देण्यात आले आहे. 

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: