विधानसभा निवडणूकीपूर्वी कॉग्रेसला मोठा धक्का, 6 आमदार भाजपाच्या वाटेवर ? आज करणार प्रवेश

मुंबई । विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांना सोमवारी औपचारिकपणे भाजपचे सदस्यत्व मिळणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 21 ऑक्टोबरला मतदान आणि निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होतील. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे 6 आमदार मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील.

भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उमेदवारांची नावे

अस्लम शेख – मुंबई मालाड

राहुल बोंद्रे – चिखली बुलढाणा

काशीराम पावरा – शिरपूर

डी. एस. अहिरे – साक्री

सिद्धराम म्हेत्रे – अक्कलकोट, सोलापूर

भारत भालके – पंढरपूर सोलापूर

~~~~~~~~
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: